ठाणे: क्रिश्चन समुदायाचे मुंब्रा पोलिस ठाण्यात निवेदन
Thane, Thane | Oct 20, 2025 दिवा येथे प्रार्थना करण्यासाठी सहकाऱ्याच्या घरी गेले असता मारहाण झाली असल्याचा आरोप एका क्रिश्चन समुदायाच्या व्यक्तीने केला आहे. या संदर्भात आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास मुंब्रा पोलिस ठाण्यात कारवाईसाठी निवेदन देण्यात आले आहे. कारवाई झाली नाही तर येत्या 30 तारखेला मुंब्रा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे. पीडित व्यक्तीचे नाव संतोष असून संतोषने या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच मारहाण 17 तारखेला झाली होती.