सेनगाव: आजेगांव परिसरात वारंवार होणाऱ्या विद्युत समस्येमुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात, शेतकरी चिंतेत
सेनगांव तालुक्यातील आजेगांव सह परिसरामध्ये सद्यस्थितीत रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. कारण विद्युत पुरवठा सुरळीत राहत नसल्यामुळे व तसेच दहा दहा मिनिटाला विद्युत गुल होत असल्यामुळे खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे किमान सुरळीत आठ तास वीज पुरवठा देण्याची मागणी आजेगांव शिवारातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. आजेगांव परिसरामध्ये दुपारा 2 वाजता विद्युत लाईट येते.