बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळविल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली असून, भंडारा जिल्ह्यात या कारवाईचे ठोस परिणाम दिसून आले आहेत. तपासणीअंती खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाल्याने एका महसुली कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, दुसऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.