अकोट: वर्षातून एकदाच दर्शन होणाऱ्या नरसिंग महाराज तपोभूमी येथील कार्तिक स्वामी यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Akot, Akola | Nov 5, 2025 वर्षातून एकदाच उघडणार्या कार्तिक स्वामी मूर्तीचे मुखदर्शन घेण्यासाठी अकोला नाक्या जवळील नर्सिंग महाराज तपोभूमी मंदिरात बुधवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती तर कार्तिक स्वामी यांचे कार्तिक पौर्णिमेला वर्षातून एकदाच मुखदर्शन होत असल्याने भाविकांनी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी कार्तिक स्वामी यांचे मनोभावे दर्शन घेऊन पूजन केले तर अनेक भाविकांनी यावे कार्तिक स्वामी यांना मोरपंख अर्पण करून आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद मागितले.