कोरेगाव: जिहे कठापूर योजनेच्या धर्तीवर पाच मोठे बंधारे बांधणार; कोरेगाव मतदारसंघाचा शेती पाण्याचा प्रश्न निकाली : आ. महेश शिंदे
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे. यापूर्वी महायुती सरकारने दोन टीएमसी पाणी या मतदारसंघाला दिले असून जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर आणखी पाच मोठे बंधारे उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारे अडीच टीएमसी पाणी मतदारसंघाला आणखी उपलब्ध होणार आहे. बारामाही ओढे, नाले आणि नद्या खळखळून वाहतील आणि शेती पाण्याचा प्रश्न संपुष्टात येऊन शेतकऱ्यांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला.