यावल नगर परिषदेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील यांनी शेळगाव बॅरेज वरून पाणी उचल योजनेच्या आराखड्याची पाहणी केली. यात शहरात जलकुंभ आवश्यक आहेत तसेच जॅकवेल व पंप हाऊस येथे कर्मचाऱ्यांना थांबण्यासाठी निवासस्थान गरजेचे आहे म्हणून त्यांनी प्रकल्प सल्लागार समितीला सुधारित अंदाजपत्र शासनाकडे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत त्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या दूर होतील असे त्यांनी म्हटले आहे.