धामणगाव रेल्वे: वीर महाराणा प्रताप चौक येथे परसोडी ,हिंगणगाव, कासारखेड ,निंबोली नागरिकांचा रस्ता रोको व चक्काजाम आंदोलन
धामणगाव रेल्वे तालुक्यातील परसोडी, हिंगणगाव व कासारखेड, निंबोली येथील नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी धामणगांव रेल्वेतील वीर महाराणा प्रताप चौक येथे मोठ्या प्रमाणावर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात हजारो नागरिक, महिला व विद्यार्थी सहभागी झाले होते. सरपंच दुर्गाबक्ष ठाकूर व उपसरपंच संगीता धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन राबविण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे.