बुलढाणा: जिल्ह्यात विजयाचा कडकडासह पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर द्वारे प्राप्त पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात दि.१४ ऑक्टोबर रोजी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.त्यानंतर दि.१५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान तुरळक/काही ठिकाणी अगदी हलक्या ते हलक्या पावसाची शक्यता आहे.दि. १६ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.