भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संचलित संकलन समितीने यंदाही समाजाभिमुख उपक्रम राबवत महामानवाला आगळीवेगळी आदरांजली वाहिली. शनिवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर 'एक वही एक पेन' या अनोख्या अभियानाचे आयोजन केले.