जालना: जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणुकीसाठी मतदान सुरू
Jalna, Jalna | Apr 26, 2026 महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीसाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात मतदान प्रक्रियेला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यस्तरावर एकूण नऊ पदांसाठी ही निवडणूक होत असून, प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालय हे मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. या निवडणुकीत मेडिकल क्षेत्रातील प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावत आहेत. जालना जिल्ह्यात एकूण १०१० मतदार नोंदणीकृत असल्याची माहिती सहयोगी प्राध्यापक श्रीमती प्रतिभा देशमुख यांनी दिली. मतदान प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्ध