अकोला: अकोला मनपा निवडणूक 2025 : प्रारूप मतदार यादीवर 1475 हरकती-सुचना
Akola, Akola | Dec 3, 2025 मनपा निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीवर आजपर्यंत एकूण 1475 हरकती व सुचना प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे यांनी दिनांक 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता दिली. सर्व हरकतींची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी 20 प्रभागांसाठी 20 पथके नेमण्यात आली असून नागरिकांच्या हरकती स्थळ निरीक्षणातून निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.