भद्रावती: श्री स्कील कैंपुटर्स चे संचालक विक्रांत बिसेन नागपूर येथे ज्ञान गौरव पुरस्काराने सन्मानित.
शहरातील श्री स्कील कैंपुटर्सचे संचालक विक्रांत बिसेन यांना इंडीया एज्युकेशन आवार्ड २०२५ अंतर्गत ज्ञान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नागपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध बालीवूड सिनेतारका तथा मिस इंडिया साहिली भगत यांच्या हस्ते त्यांना सदर पुरस्काराचे प्रदान करण्यात आले.या अवार्ड प्रक्रीयेत संगणीय शैक्षणिक क्षेत्रातील देशभरातील तिन हजार शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. पुरस्कार मिळाल्याबद्दल बिसेन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.