भिवंडी: पत्नीचे धडापासून शिर वेगळे करणाऱ्या पतीला ठोकल्या बेड्या, पोलिसांनी सांगितली धक्कादायक माहिती
भिवंडीतील खाडी मध्ये एक धड नसलेले शिर असल्याची माहिती मिळताच भोईपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शीर ताब्यात घेऊन त्यांनी तपास सुरू केला. त्यानंतर ओळख पटली आणि तिच्या पतीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले असता त्याने हत्या केल्याचे कबूल केले. मात्र तो वेगवेगळी कारणे देत असल्यामुळे नक्की कशामुळे हत्या केली याबाबत अद्याप पर्यंत माहिती मिळू शकलेली नाही. परंतु मुलांना मारहाण करत होती, तसेच चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद होत होते अशी माहिती मिळत आहे मात्र ठोस पुरावे मिळाले नाहीत.