ठाणे: मुंब्रा येथे मुस्लिम समाजाचे अनोखे आंदोलन, आमदार संग्राम जगताप यांचे फोटो लावले रस्त्यावर
Thane, Thane | Oct 17, 2025 दिवाळीमध्ये मुस्लिम दुकानदारांचा बहिष्कार करा, फक्त हिंदू दुकानदारांकडून सामान खरेदी करा असा आवाहन अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज नाराज झाला होता. तसेच जगताप यांच्या विरोधात आंदोलन देखील झाले. मात्र संग्राम जगताप यांनी मुस्लिम हे हिरवे साप आहेत अस म्हणत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केल आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास जुम्माच्या नमाजनंतर मुंब्रा येथे मुस्लिम समाजाने अनोखे आंदोलन केलं आहे.