मोहाडी: कांद्री येथे मटका जुगार खेळणाऱ्या आरोपी विरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे दि.7 नोव्हेंबर रोज शुक्रवारला सायं. 5:00 वाजताच्या सुमारास आंधळगाव पोलिसांनी मटका जुगार खेळणारा आरोपी शुभम अशोक समरीत याला ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातून नगदी 930 रुपये व मटका जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार बंदी कायदा अन्वये आरोपी विरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.