उपविभागीय पोलीस अधिकारी, साकोली यांच्या पथकाने दिनांक २८ ऑक्टोंबर रोजी सकाळी सात वाजता दरम्यान केलेल्या धडक कारवाईत मौजा परसोडी मेळघाट येथील चुलबंद नदी पात्रात अवैधरित्या रेतीची चोरी करणाऱ्या १२ इसमांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी ७ ट्रॅक्टरसह एकूण ₹ ५६,६५,३००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथक पोहोचले असता, घटनास्थळी एकूण ७ ट्रॅक्टर आणि १२ इसम अवै