केज: नांदूरघाट येथे दहा-बारा महिलांनी मिळून दरवाजा तोडून कुटुंबाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल
बीड च्या कज तालुक्यातील नादुर घाट यथाल 10 ते 12 महिलांकडुन घराचा दरवाजा तोडत कुटुंबाला मारहाण. बीडच्या केज तालुक्यातील नांदुर घाट येथील 10 ते 12 महिलांकडुन जयश्री दळवी या महिलेसह कुटुंबातील सदस्यांना घराचा दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश करत बेदम मारहाण करण्यात आली. तर घरातील साहित्यांची देखील तोडफोड करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार जागेच्या वादातून झाल्याची माहिती समोर येत आहे. घराच्या बाहेर काढत महिलेसह कुटुंबातील सदस्यांकडे असलेली रोख रक्कम आणि काही सोने देखील नेले.