कामठी तालुक्यातील कवठा येथील 'ट्रुफॉर्म टेक्नो प्रॉडक्ट प्रा. लि.' कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा एका निष्पाप कामगाराच्या जीवावर बेतला आहे. टेकाडी येथील रहिवासी प्रमोद नत्थुजी बोराडे वय ४५ यांचा कामावर असताना झालेल्या अपघातात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, कंपनी मालकाने केलेल्या एका संतापजनक आणि अमानवी वक्तव्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली.