भंडारा: शहरातील तहसील कार्यालय परिसरात दुकाने जळून खाक; झेरॉक्स मशीन व विविध साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान
भंडारा शहरातील तहसील कार्यालय परिसरात आज, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता दरम्यान अचानक आग लागून काही दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत ३ दुकानांमधील झेरॉक्स मशीन, प्रिंटर महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. नागरिनीही आग विझवण्यासाठी मदत केली, मात्र तोपर्यंत दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.