जळगाव: बोरनार येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ अभियानाचा शुभारंभ; ग्रामस्थांना दिली शासकीय योजनांची माहिती
जळगाव तालुक्यातील बोरनार येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत बुधवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत अधिकाऱ्यांनी अभियानाबद्दल सविस्तर माहिती देत, गावात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. या अभियानाचा मुख्य उद्देश गावाचा सर्वांगीण विकास साधणे आणि पंचायत राज व्यवस्था अधिक बळकट करणे हा आहे.