धर्माबाद: सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय ते काकाणी शाळेपर्यंत रन फॉर युनिटी दौड संपन्न
देशाचे लोहपुरुष म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे असे महान व्यक्तिमत्व सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 150 वी जयंती, शासन स्तरावर या निमित्ताने रन फॉर युनिटी हा छोटेखानी कार्यक्रम सर्वत्र साजरा करण्याचे ठरवले होते, धर्माबाद शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथे सकाळी सात वाजता ही दौड सुरू झाली होती तर समारोप राजाराम काकाणी शाळा इथे 8 च्या सुमारास झाली आहे, यावेळी धर्माबाद शहरातील प्रतिष्ठित नागरिक डीवायएसपी पाटील, पोनि भडीकर यांच्या सह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.