जिल्ह्यात पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली
Beed, Beed | Oct 29, 2025 हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत बीड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या कालावधीत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, अचानक वातावरणात बदल होऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः खुल्या मैदानात किंवा झाडाखाली थांबू नये, मोबाईलवर संभाषण करताना विजेच्या कडकडाटाच्या वेळी काळजी घ्यावी