नांदेड: शिवाजीनगरचे कंत्राटी इमारत निरक्षक शिवपुरे यांची चौकशी करून कारवाई करा: शिवसेना उपशहप्रमुखाची महापालिका आयुक्ताकडे मागणी
Nanded, Nanded | Sep 16, 2025 मनपा क्षेत्रीय कार्यालय ०३ शिवाजीनगरचे कंत्राटी इमारत निरक्षक भरत शिवपुरे हे रूजु झाल्यापासून त्यांनी हाताळलेल्या सर्व अनाधिकृत बांधकामाची चौकशी करावी आणि चौकशी अंती त्यांना तत्काळ कामावरून कमी करणे याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण उपशहप्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी महापालिका आयुक्ताकडे आज एका निवेदनाद्वारे मागणी केली असल्याची सविस्तर माहिती आज रोजी दुपारी बामणीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात आपल्या प्रतिक्रिया द्वारे दिली आहे.