दर्यापूर: निंबारीजवळ दुचाकी घसरून अपघात; दोघे गंभीर जखमी
दर्यापूर मार्गावरील निंबारी गावाजवळ ६ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १०:३० वाजताच्या सुमारास दुचाकी घसरून अपघात झाला.यात दोन युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती आज सकाळी समोर आली आहे.जखमी युवक हे दुचाकीने दर्यापूरहून आपल्या गावाकडे परतत असताना निंबारी येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ त्यांची दुचाकी अचानक घसरली.यात चालक व सोबतीस खाली पडून गंभीर दुखापत झाली.अपघाताची माहिती मिळताच युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेच्या मदतीने अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात