साकोली: शंकरपूर येथील अंगणवाडी मदतनीसची भरती करण्यात आली रद्द,नव्याने होणार भरती प्रक्रिया
साकोली तालुक्यातील वडेगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शंकरपूरच्या अंगणवाडीतील मदतनीस वर्षा लांजेवार ही स्थानिक नसल्याने तिची बाल विकास प्रकल्प अधिकारी साकोली यांनी भरती अवैध ठरवली असून ही नव्याने भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद भंडाऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद साळवेंनी सोमवार दि1डिसेंबरला दुपारी4 वाजता दिली.हा लढा शंकरपूरच्या सेजल सयामच्या नेतृत्वात शंकरपूरच्या गावकऱ्यांनी दिला होता.सेजलचा सत्कार देखील अनेक संघटनांनी केला होता.तिच्या लढ्याला यश मिळाले आहे