नांदगाव: मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रिपाई आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आनंद उत्सव साजरा
मनमाड शहरामध्ये भव्य भीमसृष्टी व्हावी या दृष्टिकोनातून रिपाईच्या वतीने रिपाई चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांनी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्याकडे मागणी केली होती त्या दृष्टिकोनातून आज मनमाड नगरपालिकेच्या माध्यमातून भीमसृष्टीसाठी दोन एकर जागा मंजूर करण्यात आल्यानंतर रिपाई आणि शिवसेना च्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर एकच आनंद उत्सव साजरा केला