रोहा: तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या भाषणात खा. सुनिल तटकरे यांच्यावर जोरदार टिका..
Roha, Raigad | Oct 10, 2025 शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा खा. सुनिल तटकरे यांना डिवचले आहे. रोहा येथे महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार दळवी यांनी तटकरे कुटुंबाला टिकेचे लक्ष केले. कोणावर अन्याय करू नका, ताईचा, भाईचा, साहेबांचा फोन येईल अस चालणार नाही. अस सांगताना रोह्यातील दबावाचा राजकारणाचा दळवी यांनी उल्लेख केला.