पालघर: कातकरी समाजाविरोधात होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आत्मकलेश आंदोलन करणार; आमदार स्नेहा दुबे पंडित
कातकरी समाजातील मुलींची विक्री कातकरी समाजातील नागरिकांची वेठबिगारी असे अनेक अपराध घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी देखील सजग राहून या विरोधात आवाज उठवायला हवा. कातकरी समाजाविरोधात होणाऱ्या अन्यायाविरोधात श्रमजीवी संघटनेच्या आत्मक्लेष आंदोलनात सहभागी होत आत्मक्लेश एक दिवसाचा उपवास करणार असल्याचे वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांनी सांगितले आहे.