खुन किंवा अत्याचाराच्या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शैक्षणिक अर्हतेनुसार गट-क व गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक आज दि. ०४ डिसेंबर ला २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.