जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती दिसून आली. जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेकरिता दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पासून काँग्रेसच्या सदभावना भवन जिल्हा कार्यालयात मुलाखत प्रक्रियेचं आयोजन करण्यात आलं होतं.