नागपूर ग्रामीण: बुटीबोरीत अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; ३ लाख २८ हजारांचा मुद्देमाल
बुटीबोरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संविधान चौक परिसरात कारवाई करून विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्र. एमएच ३६/एल ३०९७) आणि ट्रॉली जप्त केली. या प्रकरणी चालक अक्षय रघुनाथ अलोने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मालक शाहिद अन्सारी याचे नाव निष्पन्न झाले आहे.