जळगाव: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काव्यरत्नावली चौकातून निघाली एकता रॅली
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीच्या राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने शुक्रवार (३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता काव्यरत्नावली चौक येथून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 'एकता रॅली'च्या माध्यमातून सरदार पटेल यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली आणि नागरिकांना राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.