दिग्रस: दिग्रसच्या बाजारपेठेत दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची उसळली गर्दी; सणाचं वातावरण सर्वत्र व्यापलं
दिग्रस शहरातील बाजारपेठ आज दि.२१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत दिवाळीच्या खरेदीसाठी लोकांनी गजबजलेली होती. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी सहपरिवार खरेदीसाठी बाजारपेठेत हजेरी लावली होती. बाजारातील दुकाने दिवाळीच्या खास साहित्याने सजवली होती; मातीचे दिवे, फटाके, सजावटीच्या वस्तू आणि मिठाईच्या विशेष साठा पाहायला मिळाला. लोकांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा उत्साह स्पष्ट दिसत होता. घरगुती खरेदीसह, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाइकांसह नागरिकांनी खरेदीचा आनंद लुटला.