जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात 'रुट्स अँड विंग्स' या विशेष संकल्पनेवर आधारित वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, बोर्ड ऑफ डायरेक्टर परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.