जालना: विविध आरोग्य शिबीराने कर्मचार्यामध्ये आरोग्या बाबद जागरुकता वाढते;मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पि.एम.यांचे प्रतिपादन
Jalna, Jalna | Oct 13, 2025 सुदृढ दात म्हणजे सुदृढ आरोग्याचा पाया असून विविध आरोग्य शिबिरांमुळे कर्मचार्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी व्यक्त केले. सोमवार दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा परिषदेत अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी मोफत दंत तपासणी शिबीर घेतले.