जालना: धारदार तलवार, खंजीर व कट्यारसह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Jun 29, 2026 जालना जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणार्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने अंबड येथे कारवाई करत धारदार तलवार, खंजीर व कट्यार बाळगणार्या एका युवकाला अटक केली. सोमवार दि. 29 जून 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या ताब्यातून सुमारे चार हजार रुपये किमतीची धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.