जालना: अपघातमुक्त जालना मोहिमेला वेग; वाहतूक शाखेकडून रिफ्लेक्टर बसवून सुरक्षिततेचा दिला संदेश
Jalna, Jalna | Jun 7, 2026 जालना जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘अपघातमुक्त जालना’ मोहिमेंतर्गत जालना वाहतूक शाखेकडून स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रविवार दि. 7 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या गस्तीदरम्यान वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, पोलीस अंमलदार पवन सुलाने तसेच चालक बनसोडे यांनी जालना-अंबड रोडवरील विविध ठिकाणी रिफ्लेक्टर टेप व परावर्तक चिन्हे बसवून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.