पाटोदा: सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात वाल्मीक कराड यांचे फोटो झळकले, प्रशासनाकडून आरोपींची फोटो लावण्यास बंदी
Patoda, Beed | Oct 2, 2025 मेळाव्यादरम्यान आरोपी वाल्मीक कराड याचा फोटो झळकला असून काही कार्यकर्त्यांनी हातात त्याचा फोटो घेत आनंदोत्सव साजरा केल्याचे दृश्य अनेकांनी पाहिले. यामुळे कार्यक्रमात अनपेक्षित वळण लागले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट सूचना दिल्या होत्या की आरोपी अथवा गुन्हेगारी प्रकरणात अडकलेल्या व्यक्तींचे फोटो बॅनर, पोस्टर किंवा कार्यक्रमस्थळी लावू नयेत. तरीसुद्धा असा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.