चांदूर बाजार: शिरखेड येथे शेतकऱ्याने सोयाबीन पिकात रोटावेटर फीरवुन,सोयाबीन पीक केले नष्ट
आज दिनांक 13 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता शिरखेड येथील एका शेतकऱ्याने सोयाबीनच्या पिकात रोटावेटर फिरवून सोयाबीनचे पीक नष्ट केले. परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसाने कपाशी संत्रा सोयाबीन अशा सर्वच पिकाचे नुकसान झाल्या असून, सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असले तरी सोयाबीन पिकाला बाजारपेठेत मातीमोल भाव असल्याने, काढणी करिता लागत असलेल्या मजुराचे मजुरी सुद्धा निघत नसल्याने संतप्त मनस्थितीत या शेतकऱ्याने सोयाबीन पिकात रोटावेटर फिरवून संपूर्ण पीक नष्ट केले आहे