हवेली: शेवाळवाडी परिसरात भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू
Haveli, Pune | Sep 14, 2025 पुणे - सोलापूर महामार्गावरील भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचारी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शेवाळवाडी परिसरात घडली.शुक्रवारी (ता. 12) पहाटे सव्वापाचच्या सुमारास शेवाळवाडी (ता. हवेली) परिसरात हि घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.