अकोट: शहर पोलिसांची अवैध दारू वाहतुक करणाऱ्यावर पोपटखेड मार्गावर धडक कारवाई ९१हजार ९०० रूपयाचा मुद्देमाल जप्त
Akot, Akola | Nov 28, 2025 शहर पोलिसांच्या डि.बी पथक प्रमुख पोउपनि वैभव तायडे सोबत नापोकों विपुल सोळंके व पोकों अश्विन चौव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन कृषी उत्पन्न बाजार समिती समोर २ पंचासोबत थांबुन माहिती प्रमाणे एक इसम त्याचे मोटर सायकलवर कलदार चौकाकडून येतांना दिसला.त्यास पंचासमक्ष नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नारायण भिकाजी चंदन वय ४५ वर्ष रा.बोर्डी ता. अकोट जि.अकोला असे सांगितले व पंचासमक्ष त्याचे जवळ असलेल्या नायलॉन थैलीची पाहणी केली असता त्यामध्ये मुद्देमाल मिळुन आला.