कर्जत: साळोख ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेला मोठी ताकद; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना गटात प्रवेश
Karjat, Raigad | Nov 11, 2025 कर्जत–खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाची पताका उंचावत असताना, साळोख ग्रामपंचायतीतही मोठा राजकीय कलाटणीचा क्षण पाहायला मिळाला. विकासकामांचा धीरगंभीर ओघ, स्थानिकांमध्ये वाढलेला विश्वास आणि नेतृत्वातील पारदर्शकता यामुळे शिवसेना शिंदे गटाकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचेच प्रत्यंतर म्हणून साळोख ग्रामपंचायतीतील विविध पक्षांमधील असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र येत कर्जतच्या बाळासाहेब भवन इथे शिवसेना शिंदे गटात भव्य प्रवेश केला.या सामूहिक पक्षप्रवेश सोहळ्याला जिल्हा प्रमुख संतोष भोईर, पंचायत समितीचे उपसभापती मनोहर थोरवे, उपतालुका प्रमुख भरत डोंगरे, तालुका संघटक सोहेब बुबेरे, भानुदास राणे, पंचायत समिती संघटक संतोष मुंडेरे, तसेच हरिचंद्र निरगुडा, संदीप राणे, दशरथ पारधी, यैतिष आगिवले यांसारखी मान्यवर नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.