पनवेल: केवळ सिंधुदुर्ग नाही तर संपूर्ण राज्यात महायुतीचीच आमची भूमिका आहे – सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार
Panvel, Raigad | Nov 8, 2025 केवळ सिंधुदुर्ग नाही तर संपूर्ण राज्यात महायुतीचीच आमची भूमिका आहे, अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले या स्तरावरच होईल. अशी प्रतिक्रिया आज शनिवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.