किवळे येथे पहाटेच्या सुमारास घरफोडी करुन सव्वा पाच लाखांचा ऐवज चोरुन नेणाऱ्या दुधानी टोळीतील चोरट्यांचा गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन त्यांना अडविले. त्यावेळी त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. तरीही न डगमगता पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.