जिल्ह्यातील पोलीस ठाणे गोंडपिंपरी हद्दीतील मौजा करंजी येथे आज दि.७ नोव्हेंबर ला रात्री ८ वाजता पोलिसांनी नाकाबंदी करून गोवंश कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत १२ गोवंश जनावरे (किंमत ₹१,८५,००० आणि पिकअप वाहन क्र. MH34-BZ-6550 किंमत ₹४,००,००० असा एकूण ₹५,८५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.