पतंजली परिवाराच्या वतीने दारव्हा येथे आयोजित बैठकीत पतंजली समितीची दि. १२ जानेवारीला स्थापना करण्यात येऊन विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारत स्वाभिमान ट्रस्टचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश राठोड होते. पंडितजी वारंगे, शरदजी टेंभेकर व संदीपजी खांदवे यांनी योग, स्वदेशी, आरोग्य व शेतकरी हिताच्या कार्याचा विस्तार करण्याचे आवाहन केले.