नागपूर ग्रामीण: कोराडी तलावात उडी घेऊन तरुणाची आत्महत्या; परिसरात खळबळ
कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध कोराडी तलाव परिसरात आज एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने तलावाच्या पाण्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खापरखेडा निवासी सचिन लोंढे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिनची दुचाकी तलावाच्या काठावर उभी असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले.