भद्रावती: बंगाली कैंप येथील उत्खननात निघालेल्या जैन मुर्तीचे संतक्षण करावे.
सकल जैन समाजाचे ठाणेदारांना निवेदन.
बंगाली कैंप परीसरातील सर्वे क्रमांक ७४ व७५ मधे करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेली मुर्ती व अवशेष हे जैन तिर्थकरांचे असुन पुरातत्व विभागाची याला पुष्टी मिळालेली आहे.त्यामुळे हे ऊत्खणन पोलीस प्रशासनाच्या देखरेखीत करुन खरा इतिहास जनतेसमोर आणावा व मुर्ती तथा अवशेषाचे संरक्षण करुन ते सखल जैन समाजाच्या स्वाधीन करावे अशी मागणी सकल जैन समाजातर्फे ठाणेदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.