खटाव: सायलेन्सरमधून चित्र विचित्र आवाज काढून धुडगूस घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर वडूज पोलिसांची सापळा रचत कारवाई
Khatav, Satara | Sep 22, 2025 सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असलेल्या महाळुंग गावातील यमाई नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते औंध येथील यमाई मंदिरातून दुर्गा ज्योत आणण्यासाठी आले होते. मात्र या प्रवासादरम्यान माण तालुक्यात काही युवकांनी आपल्या दुचाकींच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठ्या प्रमाणावर कर्णकर्कश आवाज करत ध्वनी प्रदूषण केले. वडूज पोलिसांनी त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.