21 डिसेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच, आता पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन तरुणांनी पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने येऊन चक्क कर्मचाऱ्याच्या हातातील पैसे हिसकावून पळ काढला. या संपूर्ण घटनेचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आरोपी कशा प्रकारे दादागिरी करत कर्मचाऱ्याला लुटत आहेत.